मराठवाडा

जीवन जगण्याची कला ओमशांती शिकवते- अर्चना बहेणजी

प्रतिनिधी / हिंगोली – आज प्रत्येकजण धावपळीत जीवन जगत असल्याने अशांती आहे मात्र मनशांती नाही त्यामुळे मानसिक ताण तणाव वाढल्याने हृदयविकार, ब्लड प्रेशर ,शुगर आदी आजारांना बळी पडावे लागत आहे. त्यासाठी ओम शांती कडून जीवन जगण्याची कला शिकवली जाते असे प्रतिपादन प्रजापिता ब्रम्हकुमारीजच्या संचालिका अर्चना बहेनजी यांनी केले.

अकोला बायपास परिसरात असलेल्या गोविंद नगर येथील प्रजापिता ब्रम्हकुमारीज सेंटर येथे गुरुवारी (ता.१८) मे रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली, यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी प्रा. डॉ. पांडुरंग पाटील, अनिता बहेन यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.

अर्चना बहेन पुढे म्हणाल्या की धावपळीच्या जगात पत्रकारांना देखील बातमी घेण्यासाठी जीवाची पर्वा न करता पळावे लागते, मात्र एवढे कुटुंबासाठी करीत असताना सुख, शांती ,मिळाली पाहिजे तरच जीवन यशवी होईल. शांती पाहिजे असेल तर आपण ईश्वराकडे वळतो असे सांगून , अध्यात्माच्या माध्यमातून सुख, शांती मिळविण्याचा मार्ग आहे.

आजघडीला कोणत्याही क्षेत्रात काम करीत असताना ताण वाढला आहे, ताण कमी करावयाचा असल्यास मन स्थिर ठेवावे लागेल. आज लहान मुले असो की पुरुष वर्ग असो व्यसनाधीन झाल्याचे पहावयास मिळते. लहान मुलांना मोबाईलचे व्यसन लागले आहे, त्यासाठी व्यसनापासून सुटका मिळविण्यासाठी लहान मुलांना संस्कार देणे आजची काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान पुढे बोलताना म्हणाल्या माउंट अबू येथे ८ ते १२ सप्टेंबर या कालावधीत पत्रकारासाठी मीडिया शिबिराचे आयोजन केले आहे. यासाठी देशभरातून जवळ पास एक हजार ५०० पत्रकार ,संपादक, मालक प्रेस फोटोग्राफर आदींची उपस्थिती राहणार आहे. यासाठी जिल्ह्यातील पत्रकारांनी या कॉन्फरन्सचा लाभ घेतल्यास आपण आपल्या क्षेत्रात दुपटीने काम कराल हे निश्चित आहे. काम हे पोटासाठी सुखासाठी करीत आहेत. ध्यान म्हणजे परम्यातम्यांसी एकरूप होणे यातुन मेडिटेशन केल्यामुळे आपले कुटुंब, परिवार सुखी बनते असे सांगून १४० देशात प्रजापती ब्राम्हकुमारीज विश्वविद्यालयाचे कामकाज चालते असे त्यांनी सांगितले. यावेळी दोन मिनिटे मेडिटेशन बद्दल माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Share
pg slot https://slotbet.online/