५० वर्षाच्या तपानंतर औंढा नगरीत झाली वर्गमित्रांची भेट १९७२-१९७३ च्या वर्गमिञांचे स्नेहसंमेलन

प्रतिनिधी/ औंढा नागनाथ- येथे जिल्हा परिषद प्रशाला औंढा नागनाथ येथील १९७२ आणि १९७३ च्या दहावी वर्गातील वर्गमित्रांचा स्नेहसंमेलन दि.४ मार्च रोजी नागनाथ मंदीर परीसरातील भक्त निवास १ मध्ये पार पडला.स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू के. पी. गोरे तर प्रमुख पाहुणे शिक्षणाधिकारी माधव सलगर, व्ही. एम. औंढेकर, हरिराम तिवारी, विष्णूपंत कुलकर्णी, सर्जेराव चौधरी हे होते. प्रथम सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर वर्गातील मयत विद्यार्थ्यांना दोन मिनिटे स्तब्ध जागेवर उभे राहुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी बालाजी सोनुने,विष्णू पाठक, तेजकुमार झांजरी,पांडुरंग पाटील, सूर्यभान वाशिमकर ,रुस्तुम सोनुने , बंडू पंडित, मुंजाजी गोबाडे, निळकंठ देव, रावजी नागरे भास्कर पाठक, बाळासाहेब तपोवनकर शिवाजी देशपांडे ,भिकू पटवे, माणिक पाटील, हरिदास पाटील विश्वनाथ डोंगरे, शकुंतला पाठक श्याम बोधनकर, बाजीराव जाधव ,भिकू पवार, पुष्पा लांबे, रमाकांत भोजे, मनोहर पायघन, याची उपस्थित होते.
१९७२-१९७३ च्या इयत्ता दहावी वर्ग मित्राचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले. तब्बल पन्नास वर्षानंतर भेटलेल्या मित्र-मैत्रिणी एकमेकांची विचारपूस करत गप्पात मग्न झाले होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व स्नेहसंमेलन दिवसभर चाललंय. यामध्ये स्नेहसंमेलनामध्ये सकाळी नाश्ता व दुपारी जेवणाचा कार्यक्रमही झाला.हे स्नेहसंमेलन कार्यक्रम यशस्वी साठी बालाजी सोनुने, विष्णू पाठक, तेजकुमार झांजरी, विश्वनाथ डोंगरे यांनी परिश्रम घेतले.१९७२-१९७३ च्या दहावीतील वर्गमित्राचे स्नेहसंमेलन संपन्न झाले .स्नेहसंमेलनास वर्गमित्र मैत्रिणीची उपस्थिती होती.