मनरेगाची कामे आठ महीन्यापासुन बंद
मनरेगाची कामे त्वरीत करा सुरु

काकडदाभा गावातील लाभार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, युवक काँग्रेसचा या ठिय्या आंदोलनास पाठिंबा
प्रतिनिधी / औंढा नागनाथ- तालुक्यातील काकडदाभा गावातील मनरेगाची आठ महीन्यापासुन बंद असलेली कामे त्वरीत चालु करावी, या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी काकडदाभा गावातील लाभार्थ्यांनी येथील गटविकास अधिकारी बालाजी गोरे यांच्या दालनामध्ये शुक्रवारी (ता.१०) रोजी ठिय्या आंदोलन केले.

मागणीची पूर्तता झाली नाही तर पंचायत समिती समोर आंदोलन करू, असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला. यावेळी काकडदाभा येथील सर्व लाभार्थी हे गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये आंदोलनासाठी बसले होते गटविकास अधिकारी मात्र गैरहजर होते.गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात येवुन सहाय्यक गटविकास अधिकारी अशोकराव खोकले यांना निवेदन दिले.
याबाबत काकडदाभा गावातील लाभार्थ्यांनी प्रशासनास दिलेल्या निवेदनाचा आशय असा काकडदाभा येथील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाची अत्यंत गरज काकडदाभा गावास आहे.परंतु कामाची मागणी करून गोठे, सिंचन विहीर ,फळबाग,घरकुल व इतर कामे आठ महिन्यापासून बंद आहेत.काही काम केलेल्या विहिरी बुजत आहेत.घरकुल, गोठ्याची कामे अर्धवट पडली फळबागांची निंदणी सिंचन करणे बंद आहेत. अर्धवट कामे जागेवर आहेत व आजरोजी काकडदाभा गावातील लोकांच्या हाताला काम नसल्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे. तरी काकडदाभा या गावातील मनरेगाची कामे त्वरित सुरू करण्याची मागणी गावातील लाभार्थ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. येत्या आठ दिवसांमध्ये मनरेगाची कामे त्वरित चालू झाली नाही तर पंचायत समिती समोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देखील लाभार्थ्यांनी दिला आहे. या आंदोलनास युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष बालाजी करडिले यांनीही पाठिंबा दिला आहे.
या निवेदनावर पुरभाजी करडिले , बाबाराव काळे, गणेश करडिले , यादव करडिले , विठ्ठल करडिले , भारत मुरकुटे, गणेश मुरकुटे ,कुंडलिक करडिले , प्रकाश मुरकुटे, फकीरा मुरकुटे, विजय करडिले , अंगद करडिले , सिद्धार्थ सरकटे, बबन मुरकुटे, बालाजी मुरकुटे, नितीन साबळे, माणिकराव करडिले , मारोती करडिले , विलास जवादे, साहेबराव करडिले , मारोती जवादे, विजय करडिले , राहुल नागरे, पांडुरंग साबळे आदि ठिय्या आंदोलनामध्ये सहभागी असून निवेदन देतेवेळी हे सर्व उपस्थित होते.