भाजपा औंढा नागनाथ तालुका उपाध्यक्ष पदी अँड. सोपान ढोबळे पाटील यांची निवड

प्रतिनिधी / औंढा नागनाथ- येथील व्हीआयपी शासकीय विश्रामगृहात भाजपाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी वकील संघाचे माजी उपाध्यक्ष अँड. सोपान ढोबळे पाटील यांची औंढा नागनाथ तालुका उपाध्यक्ष पदी सर्वा नुमते निवड करण्यात आली असुन त्यांचा सत्कार करण्यात आला .

यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे , हिंगोली लोकसभा प्रभारी रामदास पाटील, प्रदेश कार्यकारणी सदस्य के.के. शिंदे यांच्या हस्ते प्रवेश घेतला. यावेळी महीला जिल्हाध्यक्ष उज्वला तांबोळे, माजी जि प उपाध्यक्ष मिलिंद यंबल, संतिष सोमाणी, अंकुश आहेर, शरद पाटील, वसमत तालुकाध्यक्ष खोब्राजी नरवाडे, औंढा तालुकाध्यक्ष सखाराम इंगळे, युवा तालुकाध्यक्ष मंचकराव कदम,गणेश पाटील,अँड. एस.एस. कदम,राजू आहेर, अँड. रामजी कांबळे, राहुल मेने, गजानन ढोबळे, सचिन खिल्लारे, अंगद गारकर, शंकर गोरे, माधव वानखेडे, बालाजी वानखेडे,सुधाकर सावळे यांच्या सह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
छायाचिञः- दताञय शेगुकर औंढानागनाथ