देवाच्या सानिध्यात राहायचे तर आई – वडिलांची सेवा करा

ह.भ.प नामदेव महाराज ढवळे चारठाणकर काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता
प्रतिनिधी / औंढा नागनाथ- आपल्याला देवाच्या सानिध्यात राहायचे असेल तर पहिले आपण आई-वडिलांची सेवा करणे गरजेचे आहे. तसेच माणसाने जीवनामध्ये अहंकार, भेद विसरून जीवन कसं आनंदमय करायचं ते ठरवावे, असे प्रतिपादन ह.भ.प नामदेव महाराज ढवळे चारठाणकर यांनी बुधवारी (ता. २२) श्रीक्षेत्र औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री यात्रेच्या सांगतेनिमित्त काल्याच्या कीर्तनात केले.

यावेळी विश्वस्त अँड अमोल जाधव,देवस्थानचे अधिक्षक वैजेनाथ पवार,व्यवस्थापक सुरेद्र डफळ ,मा.सचिव उत्तमराव देशमुख ,बबन सोनुने ,कृष्णा पाटील,रामप्रसाद उदगिरे,नागेश माने,गणेश उदगिरे आदींची उपस्थिती होती.
यावेळी ह.भ.प नामदेव महाराज ढवळे चारठाणकर म्हणाले, “समाजामध्ये आपला अभिमान जागृत होता कामा नये. जीवनामध्ये आपण सदैव आनंदी राहणे गरजेचे आहे. दिवसातून एक वेळेस तरी देवाचे नामस्मरण करावे, जेणेकरून दिवसभरात आपल्याला आलेला थकवा दूर होईल.आमच्या संप्रदायामध्ये आम्ही सर्वांनाच माऊली म्हणून आवाज देतो व सर्वांनाच साष्टांग नमस्कार करतो. लहान मोठा असा भेदभाव आमच्याकडे नाही. तसेच मुलींचे स्वागत करा, स्त्री- भ्रूणहत्या करू नका.” या वेळी श्री नागनाथ देवस्थानच्या वतीने ह.भ.प नामदेव महाराज ढवळे चारठाणकर यांचे श्री नागनाथ मंदिराची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती.
(छायाचिञः- दत्ताञय शेगुकर औंढानागनाथ)