औंढा शहरात RAF जवानाकडुन पथसंचलन

प्रतिनिधी / औंढा नागनाथ- शहरात RAF फोर्स मुंबईच्या वतीने औंढा शहरातील प्रमुख मार्गाने पथसंचलन काढण्यात आले. तसेच RAF चे ७० जवान हिंगोली जिल्ह्यांमध्ये दाखल झाले असून RAF फोर्स आठ दिवस हिंगोली जिल्ह्यांमध्ये राहणार असून औंढा नागनाथ येथे आज दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता शहरातील प्रमुख मार्गाने RAF फोर्सने पंथ संचलन करून नागनाथ मंदिरात जाऊन नागनाथ मंदिराची माहिती घेतली व नागनाथ प्रभूचे दर्शनही घेतले.

यावेळी पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे,RAF चे डीसी श्री शानहाज ,असिस्टंट डीसी विशाल बनेर, पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे, पोलीस उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे पाटील यांच्यासह RAF फोर्सचे सत्तर जवान व RAF वाहन यावेळी या पथसंचलनामध्ये होते. औंढा नागनाथ देवस्थान कडून असिस्टंट डीसी विशाल बनेर यांना नागनाथ मंदीराची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे,पोलीस उप निरीक्षक मुंजाजी वाघमारे पाटील, देवस्थानचे अधीक्षक वैजनाथ पवार ,व्यवस्थापक सुरेंद्र डफळे यांनी केले.
RAF हा फोर्स हिंगोली जिल्ह्यांमध्ये सेन्सिटिव्ह ठिकाणे व शहरे यामधून पथसंंचालन काढणार आहेत.
छायाचिञः- दताञय शेगुकर औंढानागनाथ