रथोत्सवात गुंजला ‘हर हर महादेव’चा जयघोष

श्रीक्षेञ औंढा नागनाथ महाशिवरात्री उत्सव;हजारो भाविकांची उपस्थिती
प्रतिनिधी / औंढा नागनाथ- ‘हर हर महादेव, बम बम भोले, नागनाथ महाराज की जय’च्या जयघोषामध्ये मंगळवारी (ता. २१) रात्री दहा वाजता महाशिवरात्रीनिमित्त येथील आठ ज्योतिलिंग नागनाथ मंदिरामध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीत रथोत्सव साजरा करण्यात आला.
श्री क्षेत्र औंढा नागनाथ येथील महाशिवरात्रीनिमित्त मंगळवारी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. यावेळी पोलिस प्रशासनाच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. श्री क्षेत्र औंढा नागनाथ येथे महाशिवरात्रीच्या उत्सवाचे मुख्य आकर्षण असणारा रथोत्सव असल्याने दुपारपासूनच हजारो भाविकांची गर्दी होती. फुलांच्या माळा आणि दिव्यांद्वारे सजावट केलेल्या रथामध्ये श्री नागनाथाची उत्सवमूर्ती ठेवण्यात आली होती.

या रथाने रात्री दहा वाजेच्या सुमारास मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा घालण्यास सुरवात झाली.यावेळी उपस्थित भाविकांनी हर हर महादेव, ओम नमः शिवाय, नागनाथ महाराज की जय ,बम बम भोले’चा गजर केला. १९४८ मध्ये झालेल्या घटनेमध्ये तिनजण हुतात्मा झाले होते. यात गणपत ऋषी, शंकर पाठक, रंगनाथ सुरवाडकर यांना तसेच सन २०११ मध्ये सतीश पाठक यांचे रथ मिरवणुकीत अपघाती निधन झाले होते. त्यांनाही या वेळी आदरांजली अर्पण करण्यात आली.
दरम्यान, देवस्थान अध्यक्ष तथा तहसीलदार डाँ कृष्णा कानगुले यांच्या हस्ते श्रीची पूजा करण्यात आली. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलिस अधीक्षक जि श्रीधर,अप्पर पोलीस अधिक्षक आर्चना पाटील, नगराध्यक्ष कपील खंदारे , उपनगराध्यक्ष साहेबराव देशमुख यांच्यासह विश्वस्त अँड अमोल जाधव,देवस्थानचे अधिक्षक वैजेनाथ पवार,व्यवस्थापक सुरेद्र डफळ,मुख्य पुजारी श्रीपाद भोपी, आदीत्य भोपी ,नारायण भोपी,नागेश गुरव,पञकार बाळासाहेब साळवे,दत्ता शेगुकर ,विलास काचगुंडे,कृष्णा रुषी आदींसह जवळपास दोन लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती होती.

रथ फिरवताना भजनी मंडळ व बँडपथक तसेच नागेश्वर शाळेमधील विद्यार्थी ढोल-ताशांसह सहभागी झाले होते. रथ उत्सवप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी घेत उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे ,राज्य गुप्त विभाग श्रीराम जामगे यांच्यासह पोलिस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे , पोलिस उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे पाटील आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

यावेळी मंहत शाम गिरी, मंहत सुरेश गिरी, गार्डप्रमुख बबन सोनुने, नगरसेवक दिलीप राठोड, प्रदीप कनकुटे विष्णू पवार, राहुल दंतवार, अनिल देशमुख, शरद पाटील, गणेश पाटील ,संदीप गोबाडे, सुरेश जावळे, मनोज देशमुख, अनील देव, अनिल देशमुख, बाळासाहेब देशपांडे, राजु गिरी प्रमोद देव, संजय पाठक, अनिल शिंदे, निळकंठ देव, शंकर काळे, दिना पाठक, तुळजादास भोपी, कृष्णा पाटील, अनिल देव, अनिल पाठक, लक्ष्मण सोनटक्के, नागेश माने, सतोष गोबाडे, भैया ठाकुर, गजानन वाशीमकर, गगाधर जावळे, सजय ठाकुर,सचिन देव, अनिल पाटील, प्रल्हाद पोपळघट, मनोज अग्रवाल, पाडुरंग पाठक आदी उपस्थिती होती.
(छायाचिञः- दताञय शेगुकर औंढा नागनाथ )