मराठवाडा
जिल्हाधिकारी कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

जिमाका / हिंगोली – येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, नायब तहसीलदार डी. एस. जोशी, माहिती सहाय्यक चंद्रकांत कारभारी यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी यांनीही आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.