सुखदेवानंद विद्यालय भांडेगांव येथे २६ जानेवारी २०२३ प्रजासत्ताक दिन साजरा

प्रतिनिधी / हिंगोली – सुखदेवानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भांडेगाव. ता. जि. हिंगोली येथे दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी विद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला मा. आमदार तानाजी मुटकूळे साहेब यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

कार्यक्रमांच्या प्रसंगी संस्थेचे सरचिटणीस श्री. उत्तमराव जगताप, संचालक श्री. ग्यानदेवराव जगताप, शाळा समिती अध्यक्ष श्री. देवबाराव जगताप, श्री संतोषराव नारायणराव जगताप (सदस्य), श्री बद्रिनाथराव उत्तमराव जगताप सदस्य, (सरंपच ) श्रीमती इंगळेताई (उपसरपंच) शिवप्रसाद जगताप व सर्व सदस्य ग्रामपंचायत कार्यलय भांडेगांव, पो.पा. नागो गिरी, आनंदराव जगताप (पाणी पुरठा अध्यक्ष) ज्ञानेश्वर तुकाराम जगताप (तंटामुक्ती अध्यक्ष) व पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. मदन पायघन, प्रा. आरोग्य केंद्र भांडेगांव. डॉ. दिवसे साहेब. श्री डॉ. गटटू साहेब, ग्रामसेवक श्री आहेर साहेब, तलाठी श्री काळे साहेब, कृषीअधिकारी श्री रणशूर साहेब. भांडेगांव येथील सर्व मान्यवर मंडळी तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक नामदेव वाबळे, तसेच जेष्ठ शिक्षक श्री गजानन वैद्य. सर श्री. ढोबळेसर कै. श्रीराम नामाजी यांच्या स्मरणार्थ ई.१० मध्ये दरवर्षी विद्यालयातून प्रथम येणा-या विद्यार्थ्यास १००१ रुपये व सन्मान चिन्ह देवून गौरव करण्यात येतो. मार्च- २०२२ मध्ये विद्यालयातून आशिष शिवाजी भुसागरे या विद्यार्थ्याचा श्री संतोष सुभाष जगताप यांच्या हस्ते सदरील बक्षिस देवून सत्कार करण्यात आला. तसेच अंजली अशोकराव करंडे (ICICI BANK MANGAR) यांचे कडून संस्थापक के. नारायणराव यांची प्रतिमा विद्यालयास भेट देण्यात आली ईयत्ता ८ वी व ५ वी चे शिष्यवृत्ति पात्र विद्याथ्र्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मार्गदर्शक शिक्षक श्री गितेसर, अब्दूलसर, घोडेकरसर, क-हाळे. जे.के सर ढाकरेसर गायकवाडसर, वाबळे. जे. एन. सर श्रीमती गाडे. सी. ए., वडकूतेसर, श्रीमती गाढवे, तसेच एकलव्य सामान्यज्ञान स्पर्धा नागपूर यांअंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत विद्यालयातील १४ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले म्हणून संस्था व शाळेच्या वतीने त्यांचे कौतूक करण्यात आले.

संबंधित विद्यार्थ्याना मागदर्शन करणारे श्री ढाकरे सर यांचा मा. आमदार साहेब यांचे हस्ते शाल व श्री फळ देवून सत्कारकरण्यात आला. त्याच बरोबर शालेय अंतर्गत क्रिडास्पर्धेचे बक्षिस वितरण कार्यक्रम मा. आमदार साहेबांच्या हस्ते सपन्न करण्यात आला. कार्यक्रमाला सर्व शिक्षक, उमाशि. व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. क्रार्यक्रमाचे सुत्रसंचालन डी. पि क-हाळे सर व पवन काळे यांनी केले व आभार श्री वाबळे नामदेवराव (मु.अ) यांनी मानले.