महाराष्ट्र

हिंगोली येथे राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा

जिमाका / हिंगोली – येथील जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय व आदर्श महाविद्यालयाच्या  संयुक्त विद्यमाने आज दिनांक 25 जानेवारी, 2023 रोजी  राष्ट्रीय  मतदार दिन  उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास हिंगोलीचे तहसीलदार नवनाथ वगवाड व महाविद्यालयाचे प्राचार्य विलास आघाव, इतर अधिकारी कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विशेष मार्गदर्शन करुन जास्तीत जास्त मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदविण्याबाबत आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात महसूल सहायक अंकुश सोनटक्के यांनी नव मतदारांना मतदार नोंदणी साठी प्रेरित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिपक कोकरे यांनी केले .

नवमतदारांनी जानेवारी, एप्रिल, जुलै, आक्टोंबर, या माहिन्याच्या 1 तारखेला किंवा त्यांच्या आधी 18 वर्षाचे होणार असाल तर त्या त्या तिमाहीत अर्ज क्र. 6 भरुन मतदार नोंदणी करु शकाल. तसेच मतदार व्होटर हेल्पलाईन ॲपव्दारे मतदार नोंदणी व दुरुस्ती करु शकतील. किंवा  बिएलओ मार्फत गरुडा ॲपव्दारे देखील मतदार नोंदणी किंवा दुरुस्ती करु शकतील. 

या कार्यक्रमावेळी तहसील कार्यालय, हिंगोली येथे लोकशाहीवर आधारीत रांगोळी स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले होते. त्याअनुषंगाने स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.  नवमतदारांना मान्यवरांच्या हस्ते मतदार ओळखपत्र वाटप करण्यात आले. आदर्श महाविद्यालय येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच मा. भारत निवडणूक आयोगाडुन प्राप्त झालेल्या लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याबाबतची शपथ घेण्यात आली. यावेळी भारत निवडणूक आयोगाकडुन प्राप्त झालेल्या विशेष संदेशाचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.

या कार्यक्रमास नायब तहसीलदार जि.ए.जिडगे,  श्रीमती ए.वडवळकर,अव्वल कारकून एस.एस.दराडे,  सी.आर.गोळेगावकर, महसूल सहायक टी डी कुबडे व इतर अधिकारी, कर्मचारी व महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Share
pg slot https://slotbet.online/