हिंगोली आरोग्य विभागातील आरोग्य कर्मचारी प्रशांत तुपकरी यांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार

प्रतिनिधी / मुंबई- दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या वतीने वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार वितरण सोहळा रंगशारदा सभागृह मुंबई येथे पार पडला यामध्ये हिंगोली जिल्ह्याला पहिला मान मिळाला यामध्ये हिंगोली आरोग्य विभागातील आरोग्य कर्मचारी श्री प्रशांत संभाप्पा तुपकरी यांचा समावेश आहे. मा\ मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्यासह, मा. प्रा.तानाजी सावंत मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रत्येकी एक लाख रुपये रोख सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत,खासदार राहुल शेवाळे, आशिष शेलार, सार्वजनिक आरोग्य विभाग प्रधान सचिव संजय खंदारे, सचिव नवीन सोना, सार्वजनिक आरोग्य विभाग राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्त धीरज कुमार, संचालक डॉ. स्वप्नील लाळे, डॉ नितीन अंबाडेकर, उपसंचालक डॉ कैलास बाविस्कर, सहाय्यक संचालक डॉ कानगुले तसेच त्यांची पत्नी सौ गीतांजली प्रशांत तुपकरी , मुलगा प्रथमेश, मुलगी रुद्रानी,आई सुलोचनाबाई संभाप्पा तुपकरी, भाऊ सुरेश, उमाकांत,वसंत यांना व तुपकरी संपूर्ण परिवार तसेच वस्सा गावातील व हिंगोली जिल्ह्यातील सर्व विभागातील तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व आरोग्य कर्मचारी,जिल्ह्यातील प्रतिष्ठात नागरिक यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला.
मी प्रशांत संभाप्पा तुपकरी आरोग्य सेवेत गेल्या 22 वर्षांपूर्वी शासकीय आरोग्य सेवेत रुजू झालो, त्यामध्ये माझी प्रथम नियुक्ती आदिवासी दुर्गम भाग यवतमाळ जिल्हात झाली, या जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवा ही मला दिलेल्या कार्यक्षेत्रात गावोगावी दिली. त्यावेळी दळणवळनाची साधनांची व्यवस्था नव्हती, त्याकाळात मी सायकल वरून कधी पायाने दुर्गम भागात जाऊन 6 वर्ष आरोग्य सेवा व आरोग्य शिक्षण दिले, त्यानंतर माझी बदली आरोग्य विभाग परभणी अंतर्गत झाली तेथे मी दोन वर्ष सेवा केली त्यानंतर माझी बदली आरोग्य विभाग हिंगोली येथे झाली हिंगोली येथे मला आरोग्य योजना मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रस्ती पत्र मिळाले तसेच जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, तालुका आरोग्य अधिकारी, यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व आरोग्य कर्मचारी यांच्या सहकार्याने जिल्ह्यात गोवर रुबेला या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य केले त्याबद्दल जिल्हा प्रशासन कडून पुरस्कार मिळाले त्यानंतर कोविड 19 च्या काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल 26 जानेवारी 2021 रोजी हिंगोली जिल्हा पालकमंत्री यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले आज पण तो क्षण मी विसरू शकत नाही तसेच भविष्यात आरोग्य सेवा व आरोग्य शिक्षण प्रभाविपने देण्याकरिता प्रोत्साहन देते.