डायमंड इंग्लिश स्कूल मध्ये क्रीडा स्पर्धेला सुरुवात

प्रतिनिधी / औंढा नागनाथ- येथील महात्मा फुले विद्यालय व डायमंड इंग्लिश स्कूल येथे सोमवारी सकाळी दहा वाजता शाळा अंतर्गत क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला आहे गटशिक्षणाधिकारी श्रीपाद पुराणिक यांनी हिरवी घेणे दाखवून झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात केली विद्यालयाच्या प्रांगणात नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यां या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष गजानन वाखरकर, मुख्याध्यापक आतिश कापसे, मनोज कांबळे( शिक्षण विभाग), विनोद पोले, संजय बोराडे, पूजा देशमुख यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी पुराणिक यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धा बाबत तसेच विविध स्पर्धेच्या बाबतीत मुलांना मार्गदर्शन केले. सदर क्रीडा स्पर्धा शाळेचे प्रांगणात दोन दिवस सुरू राहणार आहेत.
छायाचिञ-दताञय शेगुकर औंढा नागनाथ