जिजाऊ जन्मोत्सवाचे आयोजन

गुणंवत, पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा सन्मान; वेशभुषा स्पर्धेचेही आयोजन
प्रतिनिधी / हिंगोली- येथील एनटीसी भागातील छत्रपती शिवाजी राजे उद्यान परिसरात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जन्मोत्सवाचे आयोजन आई जगदंबा प्रतिष्ठाण व सिद्धीविनायक सोसायटी यांच्या पुढाकारांने गुरुवार दि.१२ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजन करण्यात आले आहे.

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जन्मोत्सवानिमित्त आई जगदंबा प्रतिष्ठाण व सिद्धीविनायक सोसायटीच्या वतीने जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी जिजाऊ पुजन, व्याख्यान, गुणवंत व पुरस्कार प्राप्त यशस्वी व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त लहान गट, मोठा गट व महिला गट अशा तीन गटात जिजाऊ वेशभुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली असुन विजेत्या स्पर्धकांना हिंगोली वन विभागाच्या वन परिक्षेत्र अधिकारी मिनाक्षीताई पवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे.
यावेळी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. जन्मोत्सव सोहळयास मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आई जगदंबा प्रतिष्ठाण व सिद्धीविनायक सोसायटी यांच्या वतीने करण्यात आले आहे.