हिंगोली

पन्नास ते साठ हजार नागरिक भारत जोडो यात्रेमध्ये सामील होतील-मा.आ.भाऊराव पाटील गोरेगावकर

हिंगोली / प्रतिनिधी–  माननीय खासदार राहुल जी गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनिमित्त हिंगोलीतही जयत तयारी असून राहुल गांधी आगमन ११ नोहेबर होतं आहे. 12  तै १३ नोव्हेंबर रोजी ते कळमनुरीत मुक्काम करणार आहेत.  १४ आणि १५  तारखेला ते हिंगोली जिल्ह्यातील वढद फाट्यावरील नियोजित ठिकाणी आपला दोन दिवस मुक्काम करून त्यापुढे ते कनेरगाव नाका येथून वाशिम जिल्हा त जाणार असल्याचे सांगितले. 

सर्व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जातात खासदार राहुल गांधी जनतेच्या समस्या जाणून घेऊन पुढे जात आहेत. राहुल जी गांधी यांनी सर्वसामान्याचे मन एकत्रित करण्यासाठी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे .

या भारत  यात्रेनिमित्त हिंगोलीतुन भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी प्रथमतः आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या निवासस्थानावरून भव्य दिव्य अशी मोटरसायकल रॅली काढण्यात आली हिंगोली ते नरसी नामदेव सेनगाव आजेगाव गोरेगाव सोना आणि नाका कनेरगाव येथे विसर्जित करण्यात येणार आहे.

यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना भाऊराव पाटील यांनी या भारत जोडो यात्रेमध्ये पन्नास ते साठ हजार फक्त हिंगोली विधानसभेतीलच नागरिक सामील होतील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भारत जोडो यात्रेत श्रेयस्फूर्तीने नागरिक पुढे येत आहेत. मोटरसायकल रॅलीमध्ये सुद्धा या विधानसभेमधील नागरिक मोठ्या आनंदाने या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होतील असे मत व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Share
pg slot https://slotbet.online/