हिंगोली

भारत जोडो पदयात्रेच्या स्वागतासाठी हिंगोलीत महत्त्वपुर्ण बैठक संपन्न

हिंगोली / प्रतिनिधी– हिंगोली जिल्ह्यात भारत जोडो पदयात्रा यशस्वी करण्यासाठी मागील काही दिवसांपासून पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते जोमाने कार्य करीत असून पदयात्रा काही दिवसातच हिंगोली विधानसभा क्षेत्रात येणार आहे.

या अनुषंगाने आज बाबुराव पाटील महाविद्यालयामध्ये माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीमध्ये काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो पद यात्रेचे हिंगोली विधानसभा क्षेत्रामध्ये भव्य स्वागत करण्याच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीमध्ये हिंगोली विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी द्वारकादास सारडा, कांतराव हाराळ, भास्करराव बेंगाळ सेनगाव तालुका अध्यक्ष, भैय्या देशमुख, सूरेश शेळके, बाजीराव जुमडे, बालाजी गावडे, गोपाल दुबे, मदन शेळके मोठ्या संख्येने काॅग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Share
pg slot https://slotbet.online/