मराठवाडा

जिल्हास्तरीय खेलो इंडिया कुस्ती प्रशिक्षण केंद्रास क्रीडा साहित्य पुरवठा करण्यासाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन

प्रतिनिधी / हिंगोली – जिल्हा क्रीडा संकुल, लिंबाळा मक्ता ता.जि.हिंगोली येथे मल्टीपर्पज इनडोअर हॉलमध्ये जिल्हास्तरीय खेलो इंडिया कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. या कुस्ती प्रशिक्षण केंद्रास 5 लक्ष रुपयाच्या मर्यादेत कुस्ती क्रीडा साहित्य पुरवठा करण्यासाठी विविध पुरवठा धारकाकडून दि. 25 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर, 2022 पर्यंत बंद लिफाफ्यात आपापले दरपत्रक कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावेत.

साहित्य पुरवठा करावयाची यादी व अटी  शर्तीचे परिपत्रक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहे. विहित कालावधीनंतर येणाऱ्या निविदांचा विचार करण्यात येणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी संजय मुंढे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Share
pg slot https://slotbet.online/