शिरपूर जैन येथे राष्ट्रसंत आचार्य 108 विद्यासागर जी महाराज यांच्या आ.बांगर यांनी घेतला प्रवचनाचा व प्रसादाचा लाभ

प्रतिनीधी/हिंगोली-हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांनी शिरपूर जैन येथे जाऊन चातुर्मास सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रसंत आचार्य 108 विद्यासागर जी महाराज यांचे मनोभावे दर्शन घेऊन त्यांच्या प्रवचनाचा लाभ घेतला.
यावेळी आमदार संतोष बांगर साहेब,हिंगोली जिल्हाधिकारी श्री जितेंद्र जी पापळकर साहेब व आ.राजेंद्र पाटणी, आ.अमित झनक साहेब व एडवोकेट मनीषजी साकळे यांच्या हस्ते कायर्क्रमाचे उद्घाटन देखील करण्यात आले.

यावेळी ऍड मनीष साकळे, जि. प. समाज कल्याण सभापती फकीरराव मुंडे, राम दादा नागरे, श्रीराम दादा राठी, जितेंद्रजी छाबडा, अनीलजी बुर्से, नगरसेवक अतुल बूर्से, रवी कानेड, दिनकर गंगावणे, कुलदीप मास्ट, निश्चल यंबल, जितेंद्रजी गोधा,शिवराज पाटील, बबलू पत्की, सुरेश शिंदे, सुरेश पवार,एस एम गंगावणे,रवी कानेड, नवीन परतवार, केतन झांझरी, प्रकाश घुगे,नितीन होकर्णे, पिंटू गडदे, रवि शिंदे, लल्ला देव, बबलू पंचलिंगे, रमेश मास्ट, यांच्या सह ईतर मान्यवर उपस्थित होते.