विश्व हिंदू परिषदेची जिल्हास्तरीय बैठक संपन्न

प्रतिनीधी/हिंगोली- येथे विश्व हिंदू परिषदेची जिल्हा स्तरीय बैठक संपन्न झाली. शहरातील शास्त्री नगर परिसरातील श्री गणपती मंदिर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये विश्व हिंदू परिषदेचे नियोजित कार्यक्रम तसेच 14 ऑगस्ट रोजी होणाऱ्या अखंड भारत अभियान 15 ऑगस्ट रोजी अमृत महोत्सव आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच संघटनंत्मक नियुक्त्या देखील करण्यात आल्याची माहिती विश्व हिंदू परिषदच्यावतीने देण्यात आली आहे.
या बैठकीमध्ये जिल्हामंत्री हभप ज्ञानेश्वर महाराज शिवणीकर यांचे मार्गदर्शन लाभले, महाराजांनी संघटनेचे ध्येय,धोरण यावर प्रकाश टाकला त्याचप्रमाणे जिल्हासहमंत्री म्हणून हभप संजय महाराज पडघान यांनी हिंदू धर्मवरील संकटे आणि आव्हाहने यावर भाष्य केले, त्याचप्रमाणे नवीन नियुक्त्या मध्ये जिल्हासंहमंत्री म्हणून हभप संजय महाराज पडघान,जिल्हा धर्मप्रसारक प्रमुख प्रभाकर महाराज कुरुंदेकर, हिंगोली प्रखंड प्रमुख पांडुरंग पोले, शहरमंत्री गणेश चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमासाठी सेवा विभाग प्रमुख प्रकाश जी शहाणे, विभाग सहमंत्री संदीप गोरे,राजेंद्र हलवाई, कैलास श्रीनाथ,गणेश चौधरी, विशाल दासर, उमेश नाईक, ज्ञानेश्वर शिंदे, धोंडबा भवर, विश्वनाथ बोराळे, ज्ञानेश्वर मखणे, नागनाथ गायकवाड,अंकुश जाधव, माधव जादव, राम हराळ, राहुल सूर्यवंशी, भागवत कदम, गजानन कानडे, अक्षय सावळे,पांडुरंग पोले, निखिल शिंदे, संजय घुगे, प्रभाकर दुतोंडे, बाळासाहेब निगडकर, शेषराव बेंगाळ, राहुल सोनी, सुरेश स्वामी, गजानन उबाळे, दिनेश वानखेडे, अजीम केंद्रे, आकाश हमाने, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष शिंदे आदी विश्व हिंदू परिषद- बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.