मराठवाडा

मराठा सेवा संघाच्या जिल्हा सचिवपदी ज्ञानेश्वर लाेंढे

हिंगाेली/प्रतिनिधी– मराठा सेवा संघाच्या हिंगाेली जिल्हा सचिवपदी ज्ञानेश्वर लाेंढे यांची निवड करण्यात आली आहे. सेवासंघाचे प्रदेशाध्यक्ष इंजिनिअर विजय घाेंगरे यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले आहे.
ज्ञानेश्वर लाेंढे हे मराठा सेवा संघ प्रणित विर भगतसिंह विद्यार्थी परिषद या कक्षाचे चार वर्ष जिल्हाध्यक्ष हाेते. त्यानंतर गेल्या दहा वर्षापासून ते मराठा सेवा संघात कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घाेंगरे, प्रदेश कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे, प्रदेश महासचिव मधुकर मेहकरे यांनी त्यांची सेवा संघाच्या जिल्हा सचिवपदी नियुक्ती केली आहे. आगामी काळात मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषाेत्तम खेडेकर यांनी दाखविलेल्या विचारधारेवर मार्गक्रम करत जिल्हृयात सेवा संघाच्या संघटनात्मक कामगिरीला अधिक बळकटी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचा विश्वास लाेंढे यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या निवडीचे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषाेत्तम खेडेकर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनाेज आखरे, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव ढाेकर पाटील, खंडेराव सरनाईक, प्रा. नामदेव दळवी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सतिश जाधव, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा राजश्रीताई क्षिरसागर, ज्येष्ठ पत्रकार तुकाराम झाडे आदींनी अभिनंदन केले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Share
pg slot https://slotbet.online/