हिंगोली

शाश्वत शेती विषयी बचत गटातील महिलांना प्रशिक्षण

धान फौंडेशन व HDFC बँक अंतर्गत परिवर्तन प्रकल्पा चा उपक्रम

  प्रतिनीधी/हिंगोली- दिनांक २३ मे २०२२ रोजी  धान फौंडेशन अंतर्गत आकाशझेप कलंजियम महिला महासंघ हिंगोली आणि HDFC बँक अंतर्गत परिवर्तन प्रकल्प व कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर संयुक्त विधेमाने कलंजीयम बचत गटातील महिलांना कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर येथे शाश्वत शेती विषयी मार्गदर्शन व सेंद्रिय शेती चे युनिट ला भेट देण्यात आली.


कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर येथे सदर धान फौंडेशन अंतर्गत स्थापित बचत गटातील महिलांना  शाश्वत शेती प्रशिक्षण चे आयोजन करण्यात आले होते. सदरील प्रशिक्षण चे प्रास्तविक  डॉ.पी.पी.शेळके वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृ.वी.के. यांनी सेंद्रिय शेतीचे फायदे , गांडूळ खत निर्मिती मधून रोजगाराच्या संधीचा घ्यावा तसेच सेंद्रिय शेती हि काळाची गरज आहे असे मनोगत व्यक्त केले.प्रा.राजेश भालेराव शास्त्रज्ञ , कृषी विद्या विभाग यांनी गांडूळ खत निर्मिती आणि खताचे महत्व आणि गांडूळ खत निर्मिती करण्याच्या पद्धती विषयी मार्गदर्शन केले. प्रा.अजय सुगावे शास्त्रज्ञ कीटकशास्त्र विभाग यांनी निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत आणि वापर करण्या संदर्भात माहिती दिली.प्रा.रोहिणी शिंदे शास्त्रज्ञ गृह विज्ञान शाखा यांनी महिलांचे शेती मधील काबाड कस्ट कमी करण्या करिता असलेले कृषी यंत्र व उपकरणे विषयी मार्गदर्शन केले.कृषी विज्ञान केंद्र येथील गांडूळ खत आणि अझोला युनिट ला महिलांनी भेट देण्यात आली.

अनिल दवणे व्यवस्थापक धान फौंडेशन हिंगोली यांनी कंपोस्ट खत,गांडून खत,असोला निर्मिती करण्याचे आव्हान केले. सदरील प्रशिक्षण चे सूत्रसंचालन श्री.विजय ठाकरे अधिक्षक यांनी केले. तर आभार अनिल दवणे यांनी केले.सदरील कार्यक्रम मध्ये राहोली,काळकोंडी,खानापूर,सवना,गोरेगाव,समगा,वायाचाल पिपरी येथील बचत गटातील शेतकरी महिला उपस्थित होत्या. मनीषा मुंगल,ओम प्रकाश गुडेवार, संतोष हनवते, प्रेम जाधव, गंगासागर बलखंडे, ललिता रणबावळे, ज्योती कोरपडे, निकिता दिपके, प्रियंका इंगळे, आफरीन व बचत गटातील महिला उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Share