संपादकीय

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, 17 सप्टेंबर हा दिवस

हैद्राबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान बहादूर नियामुद्दौला निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते. त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण हैद्राबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता.हैद्राबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या 1 कोटी 60 लाख होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा कांही भाग येत होता. मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर अनन्वित अत्याचार सुरु केले. दुसर्या दुस-या बाजूला मुक्ती संग्राम वेगात सुरु झालेला होता. यांच नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, दिंगबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, विजयेंद्र काबरा, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्त्यांकडे होते.मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले.

मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, मराठवाडयाची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिद्ध झालेल्या बदनापूर तालुक्यातील धोपटश्वर गावच्या दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरीशचंद्रजी जाधव, नळदुर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील होटी गावचे जनार्दन होर्टिकर गुरुजी तसेच परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार, विनायकराव चारठाणकर, विश्वनाथराव कातनेश्वरकर, नांदेड येथील देवरावजी कवळे, जीवनराव बोधनकर आदींच्या रूपाने मराठवाड्याच्या कानाकोप-यात स्वातंत्र्य संग्राम तेजस्वीपणे लढला गेला.दिनांक 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र सैेनिकाच्या प्रदीर्घ लढ्यानंतर हैद्राबाद मुक्ती संग्रामाची परिणती 1948 मध्ये भारत सरकारने निजाम शासनाविरुद्ध पोलीस कारवाई करुन हैद्राबाद संस्थान स्वतंत्र भारतद देशात सामावुन घेतले. दिनांक 17 सप्टेंबर 1948 रोजी हैद्राबाद राज्य निजामापासून मुक्त केले गेले.तो दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांची राजवट संपली आणि भारतास स्वातंत्र मिळाले. दिनांक 17 सप्टेंबर 1948 रोजी हैद्राबाद राज्य निजामापासून मुक्त केले गेले.

दिनांक 1 नोव्हेंबर 1956 पासून मराठवाडा विभाग मुंबई राज्यास जोडण्यात आले. दिनांक 1 मे 1960 पासून नवीन महाराष्ट्र राज्याचा भाग झाला.मराठवाडा मुक्ती संग्रामात ज्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र विरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या स्वातंत्र विरांना मानाचा मुजरा.जनसामान्यांच्या न्याय व हक्कासाठी दिनांक 22/10/2015 या दिवशी साप्ताहिक मराठवाडा संचार वर्तमान पत्रास सुरुवात केली. या लढ्यात जनतेची व वाचकांची साथ मिळाली. आपल्या प्रतिसादातुन अल्पावधीतच दिनांक 25/08/2016 रोजी दैनिक मराठवाडा संचार वर्तमान पत्र सुरु करण्याची प्रेरणा मिळाली. त्याचप्रमाणे आधुनिक युगाच्या वाटचालीवर पाऊल ठेवीत वेब पोर्टल सुरुवात करण्यात आली आहे. यालासुद्धा आपला प्रतिसाद मिळेल ही अपेक्षा !भष्ट्राचाराच्या विरोधात केवळ बातमी नव्हे तर बेधडक वृत्त प्रकाशित करुण जनसामान्यांच्या हक्कासाठी मराठवाडा संचार वृत्त समुह सदैव तत्पर असून अद्याप पर्यंत अनेक समस्यांचा प्रशासन स्तरावर कारवाई करण्यास व पिडितास न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहोत.समाजात अनेक प्रकारच्या समस्या आहेत, त्यावर उपाय करण्यासाठी व पिडीता सोबत खंबीरपणे उभे राहून न्याय मिळवून देण्यासाठी मराठवाडा संचार वृत्त समुह कार्य करीत आहे. जर आपल्या परिसरात कोणत्याही व्यक्तीवर अन्याय व अत्याचार होत असेल तर मराठवाडा संचार वृत्त समुहा सोबत संपर्क करावा.

मुख्य संपादक-शाम शेवाळकर, मो. 9822600090.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Share
pg slot https://slotbet.online/