Drugs case: शाहरुख-गौरी आर्थर रोड तुरुंगात सतत करतायत फोन, कारण..
मुंबई / प्रतिनिधी – क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी आर्यन खानला Aryan Khan अटक झाल्यापासून शाहरुख खान आणि गौरी अस्वस्थ झाले आहेत. ३ ऑक्टोबर रोजी एनसीबीने आर्यनला अटक केली. आर्यनच्या जामिनावर आता १३ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. या कठीण परिस्थितीत बॉलिवूड कलाकारांकडून शाहरुख-गौरीला Shah Rukh Khan, Gauri Khan धीर देण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र आर्यनच्या अटकेनंतर या दोघांची झोप उडाली आहे, असं वृत्त ‘इंडिया टुडे’नं सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे.

आर्यनला जामीन मिळेल, अशी शाहरुख-गौरीला आशा होती. मात्र एनसीबी कोठडीनंतर त्याची रवानगी आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली. शाहरुख आणि गौरी सतत तुरुंगात फोन करून आर्यनच्या तब्येतीची विचारपूस करत असल्याचं वृत्त आहे. आर्यनच्या तब्येतीविषयी त्यांना काळजी वाटत असून यासाठी ते दिवसातून अनेकदा फोन करत असल्याचं कळतंय. आई गौरीने मुलासाठी घरातील जेवण आणि गरजेच्या वस्तूसुद्धा तुरुंगात पाठवल्या होत्या. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्या स्वीकारण्यात आल्या नव्हत्या. आर्यन एनसीबी कोठडीत असतानाही त्याच्या खाण्याची चिंता वाटल्याने गौरी बर्गर घेऊन गेली होती. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बर्गरला नकार दिला होता.