कोकण
राज्यात वीजनिर्मितीची २७ पैकी ७ संच बंद – ऊर्जामंत्री
मुंबई / प्रतिनिधी- राज्यात सध्या कोळसा पुरवठा हा पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे भुसावळ येथील एक संच सुरू करण्यात आला आहे. सध्या भुसावळ, चंद्रपूर, पारस आणि नाशिक येथील संच बंद आहेत. देखभाल दुरुस्तीसाठी ३ संच बंद आहे. एकूण राज्यातील २७ पैकी ७ संच बंद आहेत, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले.