प्रतिनिधी / हिंगोली – शहरातील भाजी मंडी येथे भाजी मार्केट असोसिएशनच्यावतीने हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाच्या अध्यक्षासह इतर सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन भाजीमंडी असोशियन चे अध्यक्ष हाजी मोहम्मद रफीक हाजी अब्दुल कादर बागवान तसेच सर्व भाजी व्यापारी यांच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार गजानन घुगे यांचा सत्कार भाजी मार्केट असोशियन चे अध्यक्ष हाजी मोहम्मद रफीक हाजी अब्दुल कादर बागवान यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर जिल्हा व्यापारी असोसिएशन च्या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. व्यापारी महासंघाचे शहराध्यक्ष पंकज अग्रवाल, सुधीर सराफ, दीपक निमोदिया, प्रकाशचंद सोनी, सुभाष लदनीया, कांताभाऊ गुंडेवार, सचिन गुंडेवार आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY