प्रतिनिधी / हिंगोली – वंजारी समाजाला वाढीव आरक्षण मिळावे गांधी चौक येथे निषेध हिंगोली शहरातील गांधी चौक येथे वंजारी समाज बाधंवानी दिनांक ०४-१०-२०२० रोजी वार:-रविवार सकाळ ठिक ११ वाजता गांधी चौक हिंगोली येथे राष्ट्र संत भगवान बाबा व लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या प्रतिमा चे पूजन करून वंजारी समाजा ला वाढीव आरक्षण मिळावे या करिता घोषणा बाजी केली.
मागणीसंदर्भात वंजारी आरक्षण कृती समिती चे राज्य समन्वयक मा.बाळासाहेब सानप यांच्या आदेशाने वंजारी समाजाला वाढीव आरक्षण मिळावे यासाठी आज गांधी चौक हिंगोली येथे राष्ट्रसंत भगवान बाबा लोकनेते मुंडे साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून वंजारी समाजाला वाढीव आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या.यावेळी हिंगोली जिल्ह्यातील जय भगवान महासंघाचे जिल्हाप्रमुख विलास आघाव,प्रहारचे युवा जिल्हाध्यक्ष रवी उर्फ रोबोट बांगर,वंजारी विकास महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रेमनाथ घुगे, जय भगवान ऑटो महासंघाचे जिल्हाध्यक्ष भगवान बांगर, भगवान बाबा युवक संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष गोपाल बांगर, महासंघ विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष विश्वानंद दराडे, सुग्रीव दराडे, रमेश गरकळ, संजय चाटे, अनिल गुठ्ठे, प्रवीण घुगे, साहेबराव कुटे, सोपान नागरे, अर्जुन बांगर, गोपाल दराडे, निलेश घुगे,आकाश बांगर तसेच जय भगवान महासंघ, जय भगवान ऑटो महासंघ, भगवान बाबा युवक संघटना, वंजारी विकास महासंघ या सर्व संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY