प्रतिनिधी / हिंगोली – राज्याचे विरोध पक्षनेते मा. प्रवीण दरेकर हे हिंगोली येथे आले असता त्यांची महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय कृती संघटना हिंगोली जिल्ह्याच्या वतीने भेट घेण्यात येऊन अनुदानाची मागणी करण्यात आली आहे.

यामध्ये प्रामुख्याने २८ फेब्रुवारी २०१८ ला अनुदानास पात्र घोषित केलेल्या १४६ व १३ सप्टेंबर २०१९ रोजी अनुदानास पात्र घोषित केलेल्या १६३८ अशा एकत्र उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांना १ एप्रिल २०१९ पासून २०% अनुदाना पोटी फेब्रुवारी २०२० मध्ये अधिवेशनात मंजूर केलेल्या १०६ कोटी ७४ लाख ७२ हजार एवढ्या निधीचे तातडीने वितरण करण्याचा शासन आदेश काढा,प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा यांना २०% व अशंता अनुदानित यांना ४०% वेतन या आघाडी शासनाच्या १५/११/२०११ व २६/६/२०१४ च्या जुन्या धोरणाप्रमाणे नैसर्गिक टप्पा वाढ अनुदान द्या तसेच अघोषित उच्च माध्यमिक शाळा अनुदानासह घोषीत करा अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

मागच्या शासनाने 5 वर्षे नुसत्या तपासण्या केल्या व शेवटच्या वर्षांमध्ये 20 % अनुदान मंजूर केले पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी अजून झाली नाही? तेव्हा आपण मंजूर केलेल्या अनुदान वितरणाचा शासन निर्णय तात्काळ सरकारने काढावा यासाठी प्रयत्न करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा व विनाअनुदानित शिक्षक यांना त्यांच्या हक्काचं पगार त्यांच्या खात्यावर जमा करावे? या महामारीच्या काळात जवळपास 25 शिक्षक बांधवणी आपले जीवन संपविले आहे. तेव्हा आपण यावर गप्प न बसता आवाज उठवावा असे संघटनेच्या पदाधिकारी यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना जाब विचारला असता तुमच्या सर्व मागण्या मला माहिती आहे आणि मी या प्रशांची दखल घेऊन आपल्या मागण्या सरकार शी चर्चा करून लवकरच आपणाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील असे आश्वासन दिले.

यावेळी हिंगोली विधानसभा आमदार तानाजी मुटकुळे सुद्धा उपस्थित होते. मागण्या मान्य झाल्या नाही तर राज्यातील शिक्षक बांधव रस्त्यावर उतरून आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन करतील याची सर्व जबाबदारी विरोधी आणि सत्ताधारी यांची असेल असा इशारा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती संघटनेने दिला आहे यावेळी संघटनेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष प्रा. आशिष इंगळे तालुका अध्यक्ष प्रा.प्रशांत चाटसे, श्री सुनील जगताप इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY