प्रतिनिधी / हिंगोली – हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी हे कोरोना बाधित झाले होते. त्यांच्यावर आयसोलेशन वार्डात उपचार करण्यात आले. मंगळवारी ता. ११ त्यांनी कोरोनावर मात केल्याने त्यांनी डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मागील काही दिवसापासून  जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रकारचे उपाययोजना करत असताना श्री. जयवंशी  स्वतः कोरोना बाधित झाले होते. मागील दहा ते बारा दिवसापासून त्यांनी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांच्यासह जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स व नर्स व इतर कर्मचारी यांच्या सहकार्याने जिल्हाधिकारी हे कोरोनामुक्त झाले.

कोरोनावर त्यांनी मात केली असून मंगळवारी  सायंकाळी साडेपाच वाजता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांच्यासह डॉक्टर नर्स आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी यांनी कोरोना या आजारावर  जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स नर्स व इतर कर्मचारी यांचे आभार मानले व सर्व जनतेस असे आवाहन केले की कोरोना संदर्भात भीती न बाळगता नागरिकांनी सावधतेने  व काळजीपूर्वक आपले व्यवहार केले पाहिजे. बाजारात जास्त गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असे आवाहन त्यांनी केले.

LEAVE A REPLY