प्रतिनिधी / हिंगोली – काही दिवसांपूर्वी व्यापारी बंधुंनी जिल्हा धिकारी रूचेश जयवंशी यांना लाॅकडाऊन करण्यासाठी निवेदन दिले होते. त्यातच राज्यासह हिंगोली जिल्हात कोरोना चा संसर्ग वेगाने वाढत असल्याने जिल्हा धिकारी रूचेश जयवंशी यांनी विविध यंत्रणांशी चर्चा करून हिंगोली जिल्हा दिनांक 6 ते 19 आॅगस्ट या कालावधीत लाॅकडाऊन जाहीर केले. त्यातच अंगणवाडी कर्मचारी नियोजना नुसार सेवा देत आहेत.
औंढा तालुक्यातील जवळा बाजार येथील अंगणवाडी क्रमांक. 1 साधु नगर परिसर वार्ड क्रमांक 3 येथे सोशल डिस्टन सिंग ठेवत मास्कचा वापर करून लसीकरण करण्यात आले. सदर हिंगोली जिल्हा पुर्णपणे बंद असतांना सुद्धा अंगणवाडी सेविका पुर्णपणे सेवा देत आहेत. आपले नियोजित कार्यक्रम पुर्ण करत आहेत. त्या बद्दल विविध स्तरातून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. तसेच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. लसीकरण कार्यक्रमाच्या वेळेस उपस्थित कांता ताई काळे सेविका, पाथरकर ताई मदतनीस, जयश्री हाराके, आशा ताई सपना जोशी, साधना पुराणिक आदी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY