विश्व वारकरी सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी ह. भ. प. प्रकाश महाराज घुगे यांची निवड

0
180

प्रतिनिधी / हिंगोली – विश्व वारकरी सेना भारत यांच्या नुकत्याच झालेल्या एका मिटींगमध्ये ह. भ. प. प्रकाश महाराज घुगे येडुदकर यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. त्या बद्दल विविध स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
याच बरोबर विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष ह. भ. प. अरूण विष्णुपंत बुरघाटे, राष्ट्रीय अध्यक्ष ह. भ. प. तुकाराम पंढरीनाथ चवरे, महाराष्ट्रातील वारकरी सेना तसेच विश्व हिंदू परिषद बजरंग दल धर्माचार्य प्रमुख धोंडीराज पाठक महाराज हिंगोली, खटकाळी हनुमान मंदिर चे महंत विष्णू गिरी महाराज, ह.भ.प.माधव बाबा इंगोले (आळंदी), ह.भ.प.बाबुराव महाराज पुसदकर यांच्यासह अनेक संत महंतांसह अनेक जन प्रकाश महाराज घुगे यांची निवड झाल्याबद्दल कौतुक करत आहेत.

LEAVE A REPLY