प्रतिनिधी / हिंगोली-  शहरासह जिल्हा भरात 14 दिवसाच्या लाॅकडाऊनची घोषणा झाली असून आज दुसऱ्या दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला. संपूर्ण बाजारपेठ बंद असल्याने रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला घराबाहेर पडणाऱ्यांची चौकशी करण्यासाठी जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले असल्याने शहराला छावणीचे स्वरुप आले आहे.

हिंगोली जिल्हात कोरोना चा संसर्ग वेगाने वाढत असल्याने चौदा दिवसाचा लाॅकडाऊन घेण्याची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी व्यापारी संघटनांनीही सहमती दर्शवली होती. त्या नंतर जिल्हा धिकारी रूचेश जयवंशी यांनी सर्व यंत्रणांशी चर्चा करून 6ते19 आॅगस्ट या कालावधीत लाॅकडाऊन जाहीर केला आहे. या नुसार लाॅकडाऊन सुरू असल्याने बाजारपेठ कडकडीत बंद आहेत गजब जणार्‍या रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला विनाकारण फिरणाऱ्यांची पोलिसांकडून चांगलीच चौकशी केली जात आहे. शहरातील प्रत्येक चौकात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातील महात्मा गांधी चौकात उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, उपाधिक्षक रामेश्वर वैंजने यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर शहरातील काही प्रमुख भागातुनही त्यांनी भेट देऊन सूचना दिल्या आहेत. या शिवाय वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या पथकाने ही शहरात येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली आहे. विनाकारण वाहन घेऊन फिरणाऱ्यांची वाहने जप्त करण्याच्या कारवाई सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY