प्रतिनिधी / हिंगोली- जिल्ह्यात 58 नवीन कोविड-19 चे रुग्ण आढळून आले असल्याची जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी माहिती दिली आहे.

फलटन 3 व्यक्ती, महसूल कॉलनी 1 व्यक्ती, साई नगर 2 व्यक्ती असे 6 रुग्ण हे रॅपिड टेस्टद्वारे तर  रिसाला बाजार 2 व्यक्ती, सरस्वती नगर 1 व्यक्ती, पेन्शनपुरा 1 व्यक्ती,  जिल्हा परिषद क्वॉर्टर 1 व्यक्ती, देवगल्ली 1 व्यक्ती, सन्मती कॉलनी 3 व्यक्ती, गाडीपुरा 9 व्यक्ती, नगर परिषद कॉलनी 3 व्यक्ती, महादेववाडी 1 व्यक्ती, वंजारवाडा 3 व्यक्ती, तोफखाना 2 व्यक्ती, बोरीशिकारी 1 व्यक्ती, गोरेगांव ता. सेनगाव 4 व्यक्ती, गोनदनखेडा ता. सेनगांव 1 व्यक्ती, वसमतनगर 6 व्यक्ती, वापटी ता. वसमत 1 व्यक्ती, पंचायत समिती वसमत 1 व्यक्ती, जुम्मापेठ वसमत 1 व्यक्ती, चिखली वसमत 1 व्यक्ती, कळंबा वसमत 1 व्यक्ती, सतीपांगरा वसमत 1 व्यक्ती, डोंगरकडा कळमनुरी 2 व्यक्ती, विद्यानगर कळमनुरी 1 व्यक्ती, भीमनगर कळमनुरी 3 व्यक्ती, बीएसएनएल टॉवर जवळ कळमनुरी 1 व्यक्ती असे 52 रुग्ण आरटीपीसीआर टेस्टद्वारे आढळून आले आहेत. तर 5 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 7 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 5 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 12 रुग्णांची सद्यस्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 796 रुग्ण झाले असून, त्यापैकी 555 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 233 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोवीड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 8 व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY