प्रतिनिधी / हिंगोली- हिंगोली जिल्ह्यात महाराष्ट्र पोलिस भरती २०१८ मधील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची निवड प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी हिंगोलीतील उमेदवारांनी आ.मुटकूळे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले आहे.

जगभराप्रमाणे महाराष्ट्रात देखील कोरोना विषाणूचा प्रादुर्भा रोखण्यासाठी पोलिस प्रशासन चांगल्या प्रकारची कामगिरी करीत असून २०१८ मधील पोलिस भारती प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना कामावर रुजू करुन घेतल्यास पोलिस प्रशासनावरील वाढता ताण कमी होऊ शकतो. तसेच महासंकटात महाराष्ट्र सरकार अडचणीत असल्यामुळे सर्व प्रतिक्षा यादीतील उमेदवार हे १ वर्ष विना वेतन काम करण्यास तयार असल्याचे निवेदत नमुद करण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यात महाराष्ट्र पोलिस भरती २०१८ मधील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची निवड प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी हिंगोलीतील उमेदवारांनी आ.मुटकूळे यांच्या मार्फत दि.१३ जुलै २०२० रोजी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनावर गोविंद शेळके, अविनाश चव्हाण, सुखदेव कोकाटे, रवि पदमपल्ले, सुभाष रहाटे, देवा हतागळे अदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY