प्रतिनिधी / हिंगोली- जगभरातील वाढत्या कोरोनाच्या महामारीमुळे संपुर्ण अर्थव्यवस्थेवर मोठे संकट निर्माण झाले असुन सर्वच स्तरात कोणत्या ना कोणत्या प्रकारे आर्थिक देवाण-घेवाण होत आहे. परंतु ब्राम्हण समाजातील पौरोहित्य करण्यावर याचा खुप मोठा फटका पडला आहे. गेल्या १०० दिवसांच्या वर झालेल्या या लोकडाऊन मुळे मठ-मंदिर कामयचे बंद आहे. तसेच येथे येणाऱ्या भाविकांचीही बंदी असल्यामुळे या वेळेत पौरोहित्यांना उपासमारीची वेळ आली आहे. ब्राम्हण समाजातील काही व्यक्ती कडून इतके दिवस काहींना मदत मिळत गेली होती. परंतु आता कोणतीही व्यक्ती मदत करण्यास तयार नाही व लोकडाऊन उघडून सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्बंध घेतल्याने मठ-मंदिरात येणाऱ्यांची संख्या अतीशय तुटपुंजी असल्यामुळे पौरोहित्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी धोंडीराज वासुदेव पाठक यांनी जिल्हाधिकारी यांना दि. २०/०४/२०२० रोजी निवेदन दिले होते. त्यानंतर पुन्हा दि.०३/०५/२०२० रोजी दुसरे स्मरण पत्र देण्यात आले. हिंगोली जिल्ह्यातील पौरोहित्य करणाऱ्या भिक्षुकी ब्राम्हण यांना आपले महाराष्ट्र शासनमार्फत कायमस्वरुपी ५००० रु. मानधन देण्यात यावे. तसेच दि. १५/०४/२०२० या अर्जानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे तसेच पंतप्रधान कार्यालया नवी दिल्ली यांच्या मार्फत करावे. अशा विनंतीचे निवेदन धोंडीराज वासुदेव पाठक, मनोज वसंतराव गठ्ठू अदींनी केले आहे.

LEAVE A REPLY