प्रतिनिधी / हिंगोली- जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त अहवालानुसार रा. बहर्जी नगर, वसमत येथील एका 40 वर्षीय व्यक्तीस  कोविड-19 ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सदरील पुरुष परभणी येथे शिक्षक असून दि. 25 जून रोजी परभणी येथे जाऊन आला आहे. तसेच दि. 27 जून रोजी आईसोबत नांदेड येथील खाजगी रुग्णालय जाऊन आला आहे. सदर व्यक्तीस त्याला ताप, सर्दी, खोकला असल्यामुळे त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठविला होता.

कोरोना केअर सेंटर, लिंबाळा अंतर्गत चार व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ब्रिगीस्तान, रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारा पहिला 23 वर्षीय रुग्ण रा. पिंपळखुटा येथील असून तो हिंगोली जिल्ह्यात परतला आहे. तर दुसरा रुग्ण 22 वर्षीय पुरुष रा. प्रगती नगर, हिंगोली हा मुंबई येथून परतला आहे. रुग्ण क्र. 3 व 4 पुरुष वया 46 व 23 वर्ष रा. भांडेगाव, हिंगोली हे मुंबई येथू परतले आहेत. तसेच क्वारंटाईन सेंटर औंढा नागनाथ अंतर्गत भोसी गावातील एका चार वर्षीय मुलाला  कोविड-19 ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.औंढा नागनाथ येथे भरती असलेल्या दोन कोविड-19 रुग्णांसोबत एका गाडीने मुंबई येथून परतला असून आज रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात नव्याने 06 व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यानुसार जिल्ह्यात कोविड-19 चे एकूण 276 रुग्ण झाले आहेत. त्यापैकी 238 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून आज घडीला एकूण 38 रुग्णांवर उपचार चालू आहेत.

जिल्ह्यात विविध ठिकाणी भरती असलेल्या 38 रुग्ण पुढील प्रमाणे आहेत. यात कोरोना केअर सेंटर, वसमत मध्ये 03 कोविड-19 रुग्ण (1 चंदगव्हाण, 1 वसमत शहर, 1 बहिर्जी नगर) येथील रहिवासी आहेत. कोरोना केअर सेंटर कळमनुरी, येथे कोविड-19 चे एकूण 15 रुग्ण असून (6 काझी मोहल्ला कळमनुरी, 6 कवडा, 2 गुंडलवाडी, 1 बाभळी) येथील रहिवासी आहेत. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, कळमनुरी येथे कोविड-19 चे 02  रुग्ण (1 एस.आर.पी. एफ, जवान, 1 भोसी औंढा नागनाथ) उपचारासाठी भरती आहेत. कोरोना केअर सेंटर, लिंबाळा येथे कोविड-19 चे 10 रुग्ण (2 तालाब कट्टा, 2 रिसाला बाजार, 2 केंद्रा बु., 01 प्रगती नगर हिंगोली, 02 भांडेगाव, 1 पिंपळखुटा) उपचारासाठी भरती आहे. तर क्वारंटाईन सेंटर, औंढा नागनाथ येथे 03 कोविड-19 रुग्ण (2 औंढा नागनाथ, 1 भोसी) उपचारासाठी भरती आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील आयसोलेशन वार्ड, सर्व कोरोना केअर सेंटर आणि गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटर अंतर्गत एकूण 4 हजार 767 व्यक्तींना भरती करण्यात आले आहे. त्यापैकी 4 हजार 264 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह  आले आहेत. 4 हजार 231 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य:स्थितीला 528 व्यक्ती भरती आहेत आणि आज रोजीह 257 अहवाल येणे / थ्रोट स्वॅब घेणे प्रलंबित आहे.

जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना घरीच थांबून मोलाचे सहकार्य करावे. सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतु ॲप डाऊनलोड करुन घ्यावे जेणकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधीत रुग्ण असल्यास आपणास सदरील ॲप सतर्क करण्यास मतद करते.

LEAVE A REPLY