एकांत – कोरोनावर वारकरी सांप्रदायातील संतांनी सांगितलेले औषध-श्री.ह.भ.प.आकाश महाराज खोकले

प्रतिनिधी / उदगीर(राहुल शिवणे)- वारकरी संप्रदाय यामध्ये काहि संतांच्या अभंग समोर ठेवून वारकरी संप्रदायातील राष्ट्रीय वारकरी परिषदेचे परभणी जिल्हा अध्यक्ष आकाश महाराज खोकले यांनी लिहिलेला लेख
!! एकांताचे सुख देई मज देवा !!
!!आघात या जिवा चुकवुनी !!
!! ध्यानी रूपवा चे नाम निरंतर !!
!! आपुला विसर पडणे !!
संत तुकाराम महाराज
!! सुख पाहता जवापाडे !!
!! दुःख पर्वताएवढे !!
असे आपण नेहमी म्हणतो याचा अर्थ सुखाच्या तुलनेत आयुष्यात येणारे दुःख हे अनेक परीने जास्त आहे हे आपल्याला सांगायची असते. मूल जन्माला येण्यापूर्वी गर्भ अवस्थेमध्ये असताना आणि जन्माला आल्यानंतर त्याला अनेक दुखी भोगावी लागतात या यातनाची वर्गीकरण करण्यासाठी तापत्रयाची कल्पना केलेली आहे हे विविध ताप म्हणजे
अध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप आणि आधिदैविक ताप जगातील अनेक बाह्य वस्तूचा संबंध आपल्या इंद्रिया शी आल्यामुळे जे दुःख प्राप्त होते त्यालाच आधिभौतिक ताप असे म्हणता.

सध्या कोरोना नावाचा दुःखाला कारण हा ताप आहे. आपले इंद्रिय बाह्य कोरोना ग्रस्त असलेल्या माणसाशी संबंध आला की हा ताप आपल्याला चिकटतो. त्यामुळे पूर्ण विश्वाने मान्य केला आहे याला एकमेव उपाय आहे आणि तो म्हणजे एकांत बाह्य जगात जाणे नाही , एकांतात आपल्याला बंद करून घेणे. हा निर्णय घ्यायला थोडाही वेळ जरी झाला तर याचा परिणाम अमेरिका सध्या भोगत आहे एकांताचा वेळेवर निर्णय घेतला याचा फायदा काय होतो हे भारत पाहात आहे.
दोघांनी घेतलेल्या निर्णयावर काय काय परिणाम झाला हे संपूर्ण जग पाहत आहे. म्हणून आपण वेळेवर निर्णय घेतल्यामुळे इतर देशाच्या तुलनेत कोरणा चे रुग्ण भारतात कमी आहेत. आपणही सरकारला चांगला तो प्रतिसाद दिल्यामुळे त्याचाही परिणाम आपल्याला चांगला दिसत आहे. यापुढेही सरकारला सहकार्य करा प्रशासनाने सांगितलेल्या नियमाचे पालन करा आणि होईल तेवढं एकांतात राहण्याचा प्रयत्न करा कारण आपण जेवढे घरात राहू तेवढेच आपण सुखी राहू.

वेळेवर स्वच्छ हात धुवा,  तोंडाला मास्क लावा,  धन्यवाद
रामकृष्णहरी
श्री.ह.भ.प.आकाश महाराज खोकले
जिल्हाध्यक्ष, परभणी
राष्ट्रीय वारकरी परिषद महाराष्ट्र.
मो-9767666691.

LEAVE A REPLY