प्रतीनिधी / उदगीर (राहुल शिवणे)- प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सोशल मीडियावर उदगीर तालुक्यातील रेशन धान्य लाभार्थी यांच्या तक्रारी बाबत हेल्पलाईन नंबर जाहीर करण्यात आले होते.

या तक्रार निवारण हेल्पलाईन नंबरवर उदगीर तालुक्यातील रेशनिंग व्यवस्थेच्या व रेशन दुकानदांराच्या विरोधात एकूण 92 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यात राशन कार्ड धारकाकडून कार्ड आँनलाईन करणे, अथवा आधार लिंकसाठी 300ते 500 रू मागणी करणे,लाभार्थी चे आँनलाईन धान्य जास्त असताना ही कमी धान्य देणे, धान्य निर्धारित किंमती पैक्षा जास्त किंमतीने देणे,घेतलेल्या धान्याची पावती ग्राहकांना न देणे,धान स्टँकरजिस्टर न ठेवणे, दुकान बाहेर धान्य किंमतीचा बोर्ड न लावणे व केशरी कार्ड धारकांची नोंदणी न करणे अश्या प्रकारच्या काही तक्रारी असून त्यावर कठोर कार्यवाहीच्या मागणीसाठी आज प्रहार जनशक्ती पक्षाचे उदगीर तालुका अध्यक्ष विनोद तेलंगे यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळाने तहसीलदार साहेबाची यांनी भेट घेवून तक्रार केली व प्रहार जनशक्ती पक्षाकडे आलेल्या गंभीर तक्रारी बाबत लेखी तक्रार केली व उदगीर तालुक्यातील संपूर्ण रेशन प्रक्रिया पध्दतीची चोकशी करून दोषींवर त्वरित कार्यवाही करावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष जन आदोंलन उभेकरुन आदोंलन करणार,तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनावर विनोद तेलंगे. महादेव मोतीपवळे.बालाजी बिरादार .अंगद मुळे .महादेव आपटे कांबळे संगमेश्वर. राजकुमार सोमंवशी यांच्या स्वाक्षरी आहेत..

LEAVE A REPLY