प्रतिनिधी / उदगीर- तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा वाढतच जात आहे उदगीर येथील 5 रुग्ण कोरोंना बाधीत 4 जन कासराळ चे तर एक उदगीर चा लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 23 मे 2020 रोजी उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 51 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असुन त्यापैकी 44 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 5 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 2 व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आहेत.
पॉझिटिव आलेले चार रुग्ण कासराळ ता. उदगीर येथील असून हे सर्व चिमाजीवाडी येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले होते. तर एक पॉझिटिव्ह रुग्ण हा उदगीर शहरातील असून तो मुंबईतून प्रवास करून आलेला आहे. अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर व विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली.

LEAVE A REPLY