युवा अभिनेता मोहित बघेलच यांचे निधन

प्रतीनिधी / उदगीर –युवा अभिनेता मोहित बघेलच यांचे निधन झाले आहे.  वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी त्याने या जगाचा  निरोप घेतला. कर्करोगामुळे त्याचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.  इतक्या लहान वयात तर मोहितने जगाचा निरोप घेतला ही बातमी ऐकताच सिनेमासृष्टीत शोककळा पसरली आहे.
अभेनेता मोहित बघल यांनि 2011 मध्ये  सलमान खानसोबत ‘रेड्डी’ चित्रपटात छोटे अमर चौधरी ही भूमिका साकारली होती. त्याशिवाय त्याने ‘जय हो’ या सुपरहिट चित्रपटातही भूमिका साकारत आपली वेगळी ओळख बनवली होती.
पण मोहित बघल यांना डॉक्टरांच्या माहितीप्रमाणे लहानपणापासून कर्करोगग्रस्त होता. अखेरच्या काही दिवसांमध्ये तो नोएडा येथील रुग्णालयात उपचार घेत होता. परंतु कर्करोगाचा प्रभाव वाढल्यामुळे त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टर अपयशी ठरले.

LEAVE A REPLY