प्रतिनिधी / पुणे – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेले संकट लक्षात घेता संपूर्ण जगात नावलौकिक असलेला पुण्याचा ऐतिहासिक आणि वैभवशाली सार्वजानिक गणेशोत्सव यंदाच्या वर्षी पारंपरिक आणि साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय झालेल्या मानाच्या गणपती मंडळाच्या व्हिडिओ व्हिडिओ कॉन्फरसरींग मिटींगमध्ये घेण्यात आला.

यंदाचा सार्वजानिक गणेशोत्सव दरवर्षीच्या पारंपरिक पद्धतीने उत्सवमंडप उभारुन अत्यंत साध्या पद्धतीने पूजा अर्चा, गणेश याग, मंत्र जागर,अथर्वशिर्ष ,आरती असे सर्व धार्मिकविधि पार पाडून नागरिकांच्या तसेच गणेशभक्तांच्या सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेऊन साजरा करण्यात येणार आहे .अशा नित्य धार्मिक कार्यक्रमांव्यतिरीक्त होणारे इतर सर्व सार्वजानिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. शासन आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करुन सर्व अटी, नियम व शर्तींचे काटेकोर पालन करूनच गणेशोत्सव साजरा करण्यात येईल. गणेशोत्सवाच्या स्वरुपा संदर्भात पुण्यातील सर्व गणेश मंडळाना विश्वासात घेऊन बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत सर्व मंडळांनी नागरिकांना, मूर्तीकारांना आणि इतर सार्वजानिक गणेशोत्सव मंडळांना आवाहनही केले की, गणेशोत्सवात कोणीही आपल्या श्री गणरायाला कोणत्याही प्रकारचा मास्क लावू नये जेणेकरुन पावित्र्य भंग होईल.

यंदा दगडूशेठ गणपती सार्वजनिक गणेशोत्सवाच्या उत्सव मंडपाला देखावा नसणार

पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी मोठा निर्णय घेतला आहे. यावर्षी दगडूशेठ गणपती सार्वजनिक गणेशोत्सवाच्या उत्सव मंडपाला देखावा असणार नाही. दरवर्षी या उत्सवमंडपाचं रुप हा भाविकांच्या आकर्षणाचा विषय असतो. यावर्षी कोणत्याही मंदिर किंवा प्रसिद्ध वास्तूच्या देखाव्याचं रुप या उत्सवमंडपाला देण्यात येणार नाही. उत्सव मंडपात फक्त मखर असेल आणि त्यामध्ये बाप्पांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY