वृत्तसंस्था / नवी दिल्ली – राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातील शेतकऱ्यांवर एक मोठं संकट पाकिस्तानातून येत आहे. हे संकट काही दहशतवाद किंवा घुसखोरीचे नाहीय. तर, पाकिस्तानातून येणारं संकट हे टोळधाडीचं आहे. या टोळधाडीच्या संकटामुळे हजारो हेक्टरवरील पीक नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. आधीच कोरोनामुळे देश लॉकडाऊन असल्याने बाजारपेठा बंद असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव नाहीय. त्यात हे नवीन संकट उभं राहिल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.

गेलं वर्षभर राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातील महत्वाची पीकं, गहू, मोहरी, कापूस, भाजीपाला पीकांचं मोठं नुकसान झालंय. साधारण साडेआठ लाख एकरवरील पिकांना याचा फटका बसला होता. देशाच्या इतिहासतील सर्वात मोठ्या नुकसानींपैकी एक घटना मानली जाते. यात सर्वाधिक नुकसान राजस्थानमध्ये 33 पैकी 16 जिल्ह्यात, तर मध्य प्रदेशातील 15 जिल्ह्यात याचा प्रादुर्भाव झाला.

गेल्या वर्षी जानेवारीमध्ये ही टोळधाड येमेन, सौदी अरेबिया तसंच नैऋत्य इराणमध्ये होती. तिथे नीट नियंत्रण न केल्यानं जूनपर्यंत संख्या प्रचंड वाढली आणि डिसेंबरपर्यंत या टोळधाडीने भारत पाकिस्तान सीमेवर आक्रमण केलं. आणि दोन्ही देशांची चिंता वाढवली.

ही टोळधाड पाकिस्तानमधून भारतात येत असल्यामुळे गेले वर्षभर भारत आणि पाकिस्तानने या संकटाला एकत्र सामोरे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावरही वाद झाले. पाकिस्तानने वेळेत आणि प्रामाणिकपणे नियंत्रण केलं नाही, असं भारतातील तज्ज्ञ मानतात. भारतात टोळधाडीला नियंत्रणात ठेवण्यासाठी विशेष टीम नियुक्त केली आहे.

LEAVE A REPLY