प्रतिनिधी / हिंगोली  आज दि. २१ मे २०२० रोजी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असताना या आपत्ती विरोधात लढण्यासाठी कोणतीही प्रभावी उपाययोजना करू न शकणाऱ्या राज्यसरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.

यावेळी हिंगोली जिल्हा भारतीय जनता पार्टी तर्फे काळ्या फिती, काळे जेंडे, व घोषणा देऊन राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. उपस्थितात आ. तानाजीराव मुटकुळे, नगर अध्यक्ष बाबारावजी बांगर, फुलाजी शिंदे, के. के. शिंदे साहेब, कैलास सेठ काबरा, हमीदभाई प्यारेवाले, जामकर आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY