हिंगोली तालुक्यातील भिरडा गाव कंटेनमेंट झोन घोषीत

प्रतिनिधी / हिंगोली-  हिंगोली तालुक्यातील मौजे भिरडा या गावात कोविड-19 चा रुग्ण आढळून आला असून कोरोना आजाराचा इतरत्र प्रादुर्भाव होवू नये याकरीता हे क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आले आहे. या कंटेनमेंट झोनच्या क्षेत्रात भिरडा गाव, कलगाव पश्चिम बाजूस 1.5 कि.मी., पारडा गावाच्या पुर्व बाजूस 02 कि.मी., माळहिवरा गावाच्या दक्षिण बाजूस 2.5 कि.मी. आणि बफर झोन बासंबा गावाच्या उत्तर बाजूस 04 कि.मी. हे क्षेत्र कंटेनमेंट झोनमध्ये आहेत.

त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या हालचालीवर बंधने घालण्यात आले असून सर्व आवश्यक सेवा या भागात बंद करण्यात आल्या आहेत. या सेवा ग्रामपंचायतीमार्फत वेळोवेळी आवश्यकतेनुसार देण्यात येणार आहेत. या कंटेनमेंट झोन आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द भारतीय दंड सहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 व साथरोग कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

LEAVE A REPLY