आरबीआयने नि‍श्चत केलेल्या वेळापत्रकानुसार आजपासून बँकाचे कामकाज राहणार सुरु

प्रतिनिधी / हिंगोली – जागतिक आरोग्य संघटनेने करोना (कोव्हीड-19) या विषाणुमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणुन घोषीत केलेला आहे. तसेच कोरोना विषाणुचा प्रसार भारतात, महाराष्ट्रातील शहरात गतीने पसरत आहे. राज्य शासनाने करोनाचा प्रादुर्भाव प्रतिबंधासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 कायद्यातील खंड 2, 3 व 4 मधील तरतुदी नुसार अधिसुचना निर्गमीत  केली आहे.  त्याबाबतची  नियमावली देखील तयार करण्यात आली आहे. तसेच भारत सरकार आरोग्य मंत्रालय महाराष्ट्र शासन आरोग्य मंत्रालयाने जाहीर  केल्याप्रमाणे करोनाग्रस्त रुग्णाचे इतर लोकांनी संपर्कात येवू नये. तसेच सार्वजनिक किंवा खाजगी ठिकाणी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे इत्यादी बाबीमुळे या विषाणुचा संसर्ग व प्रादूर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेवून सर्व सामान्य जनतेच्या आरोग्यास धोका होवू नये याकरीता फौजदारी दंड प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश देण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सर्व बॅंकाचे व्यवहार आरबीआय ने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार दि. 18 मे, 2020 पासून खातेदारांसाठी सकाळी 10.00 ते दूपारी 3.00 वाजेपर्यंत अटी व शर्तीच्या अधीन राहून अर्थिक व्यवहार करता येणार आहे.

सर्व बँकांनी कामाची सुरुवात करण्यापूर्वी संपुर्ण जागेचे सेनिटायझेशन करुनच सुरुवात करावी. गर्दी टाळण्यासाठी  एक ते दोन मिटर अंतरावर गोल/चौकोन आखण्यात यावेत. बँकेत आलेले खातेदार आखलेल्या गोल / चौकोना मध्येच उभे राहतील याचे नियोजन करावे. खातेदाराना टोकन देण्यात यावेत, व  टोकन नुसारच व्यवहार करावेत. टोकननुसार नंबर आल्याची खातेदारांना माहिती होण्याकरीता Public Announcement System बसविण्यात यावी. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे रिकामे जागेत मंडप / शामीयाना उभारून तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. खातेदार, सुरक्षा रक्षक, बँक कर्मचारी व अधिकारी यांचे सुरक्षेसाठी मास्क व सॅनीटायझराचा वापर करणेबाबत सर्व संबंधितांना सांगावे व त्याचे पालन होईल याची दक्षता घ्यावी. एकाच वेळी बॅंकेमध्ये  5 पेक्षा जास्त व्यक्तीस प्रवेश देवू नये. दररोज कामावर येणाऱ्या अधिकारी /कर्मचाऱ्याची तसेच खातेदारांची तपासणी थर्मल गनच्या सहाय्याने करण्यात यावी. परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची व हात  धुण्याची व्यवस्था व साबण याची व्यवस्था करण्यात यावी व पाणी उपलब्ध राहील यांची ही दक्षता घ्यावी. शासनाने ठरवुन दिलेल्या अंतराच्या परीसीमांचे तंतोतंत पालन करुन बॅंकेमध्ये व बॅंकेच्या परीसरामध्ये सामाजीक अंतराचे (Social Distance) पालन करण्यात यावे व जागोजागी सुरक्षीततेच्या उपाययोजनांचे माहिती फलक लावावेत.

या आदेशाद्वारे विहित करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा आदेशाची अवज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती भारतीय दंड संहिता (1860 चा 45) यांच्या कलम 188 अन्वये शिक्षा पात्र असलेल्या अपराध केला आहे असे मानन्यात येईल.  जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

LEAVE A REPLY