वृत्तसंस्था / नवी दिल्ली – केंद्र सरकारकडून लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असून नियमावलीदेखील जाहीर करण्यात आली आहे. नव्या नियमावलीनुसार लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात मेट्रो, रेल्वे, विमानसेवा बंदच राहणार आहे. तसेच कॉलेज, शाळा, सिनेमागृह, धार्मिक प्रार्थनास्थळंदेखील बंदच राहणार आहेत. राजकीय कार्यक्रमांवरील बंदीही कायम राहणार आहे. आंतरराज्य तसंच आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त एअर अॅम्ब्युलन्सला परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने नियमावलीत हॉटस्पॉट आणि कंटेनमेंट झोनमध्ये निर्बंध कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

– आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद राहणार
– मेट्रो सेवा बंद राहणार
– शैक्षणिक संस्था बंद राहणार, ऑनलाइन शिकवणीला परवानगी
– हॉटेल, रेस्तराँ बंद राहणार
– चित्रपटगृह, शॉपिंग मॉल, जीम, पूल, पार्क, बार बंद राहणार
– सामाजिक, धार्मिक कार्यक्रमावंर बंदी कायम
– सर्व धार्मिक प्रार्थनास्थळं बंद राहणार
– बस किंवा इतर वाहनांमधून प्रवाशांच्या आंतरराज्य प्रवासाला परवानगी, मात्र संमती घेणे आवश्यक, कंटेनमेंट झोन वगळण्यात आले आहे.
– स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि स्टेडियम सुरु होणार, मात्र प्रेक्षकांना जमा होण्यास परवानगी नाही.
-सरकारी कार्यालये, कॅन्टीन सुरु होणार
– झोनप्रमाणे निर्णय घेण्याची जबाबदारी आणि स्वातंत्र्य राज्यांना देण्यात आले आहे.
– रेड, ऑरेंज, कंटेननेंट आणि बफर झोनचे सीमांकन जिल्हा प्रशासनाकडून करणार
– कंटेनमेंट झोनमध्ये फक्त जीवनाश्यक गोष्टींना परवानगी असेल.
– रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कर्फ्यू असणार
– कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणी ठरवून दिलेल्या वेळेत सर्व दुकाने आणि मॉल सुरु करण्याची परवानगी
– सर्व दुकानांनी ग्राहकांमध्ये सहा फूटांचे अंतर ठेवावे, एका वेळी दुकानावर पाचपेक्षा जास्त ग्राहकांना परवानगी नसावी
– ई-कॉमर्स कंपन्यांना रेड झोनमध्येही जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंचा पुरवठा करता येणार, सरकारने बंदी उठवली

LEAVE A REPLY