भारतीय वंशाच्या सरिता कोमातीरेड्डी बनणार अमेरिकेच्या फेडरल कोर्टात न्यायाधीश

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन – मूळ भारतीय वंशाच्या असलेल्या सरिता कोमातिरेड्डी यांना अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यासाठी नामांकित केले आहे. आता त्या न्यूयॉर्कच्या पूर्व जिल्ह्यातील न्यायालयाच्या न्यायाधीश बनतील.

सरिता कोमातिरेड्डी या प्रोसेक्युटर म्हणून त्या गेली अनेक वर्ष अमेरिकेत वकिली करत आहेत. तसेच त्या कोलंबिया लॉ कॉलेजमध्ये कायद्याचे शिक्षणही देतात. सरिता कोमातिरेड्डी यांचे कुटुंब भारतीय असले तरी त्यांचा जन्म आणि शिक्षण अमेरिकेत झाले आहे. त्यांनी अमेरिकेच्या हॉवर्ड लॉ स्कूलमधून पदवी घेतली आहे.

त्यांनी कोलंबिया सर्किट जिल्ह्याच्या अपील न्यायालयात तत्कालीन न्यायाधीश ब्रेट केव्हानो यांच्या लिपिक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्या सध्या न्यूयॉर्कमधील पूर्व जिल्हा न्यायालयातील ॲटर्नी कार्यालयात सामान्य गुन्ह्यांच्या उपप्रमुख म्हणून काम पहात आहेत. जून 2018 ते जानेवारी 2019 पर्यंत त्या आंतरराष्ट्रीय नारकोटिक्स आणि मनी लॉंडरिंग विभागाच्या देखील उपप्रमुख होत्या. त्याआधी 2016 ते 2019 या काळात त्यांनी कॉम्प्युटर हॅकिंग आणि बौद्धिक संपत्तीचे समन्वयक म्हणून काम केले आहे. आगामी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या दृष्टीने भारतीय वंशाच्या लोकांना आकर्षित करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी सरीता कोमातिरेड्डी यांची नियुक्ती केल्याचे बोलले जाते.

LEAVE A REPLY