वृत्तसंस्था/ नवी दिल्ली – केंद्रीय गृह मंत्रालयात कोरोनाने घुसखोरी केली असून या मंत्रालयातील नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) २ जवानांना कोरोना झाला. हे जवान सीआरपीएफच्या ५५व्या आणि २४३ बटालीयनमधील आहे.
जवानांना कोरोना झाल्याचे निदान झाल्यानंतर नियंत्रण कक्ष सील करण्यात आला असून निर्जंतुकीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. जवानांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. ओळख पटल्यानंतर सर्वांना विलगीकरण कक्षात पाठविण्यात येणार आहे. आत्तापर्यंत सीआरपीएफच्या १६० जवानांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान रविवारी सीआरपीएफ दलातील हेड कॉन्स्टेबल कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सीआरपीएफचे मुख्यालय सील करण्यात आले. तर सीमा सुरक्षा दलाच्या ८५ जवानांनही कोरोनाबाधित आहेत

LEAVE A REPLY