प्रतिनिधी / मुंबई – गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देश कोरोनाविरोधात लढत आहे. सर्वाधिक कोरोनाबाधित महाराष्ट्रात सापडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील चिंता वाढत असतानाच आता आणखी एक चिंता वाढवणारी माहिती समोर येत आहे. येत्या पाच ते सहा दिवसांत अवकाळी पावसाचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. त्यामुळे या वातावरण बदलाचा परिणाम आरोग्यावर आणि शेतीवर होण्याची शक्यता आहे.

सध्या महाराष्ट्रात प्रचंड तापमान आहे. या उष्णतेत शरीराची काहिली होत असताना यावर अवकाळी पावसाचा शिडकावा होणार असला तरीही हा दिलासा आरोग्य आणि शेतीच्या दृष्टीने योग्य नसल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तविला आहे. वातावरणातल्या बदलांमुळे वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडू शकतो असं वेधशाळेने म्हटलं आहे.  अवकाळी पावसाचा फळबागांना फटका बसणार आहे. 7 ते 10 मे या कालावधीत हिंगोली परभणी, नांदेड लातूर उस्मानाबाद सोलापूर सातारा सांगली पुणे कोल्हापूर भागात अवकाळी पावसाचा अंदाज आहे.

LEAVE A REPLY