प्रतिनिधी / पुणे – काल सोमवार दिं.२७/०४/२०२० रोजी कागल मधील स्थानिक प्रतिष्ठीत नागरीक व राष्ट्रवादी काँग्रेस चे कागल शहराध्यक्ष संजय चितारी यानी श्रीमंत जयसिंगराव घाडगे विद्यालय कागल या ठिकाणी क्वारंटाईन केलेल्या ८० लोकांचे पिंपळगाव मधील नाभिक कारागीर आण्णा वाडकर व त्यांच्या मुलांकडून कटींग दाढी करुन घेतले. आपली सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी त्या नाभिक कारागीराला कोणताही मोबदला न देता हा आमचा सामाजिक उपक्रम आहे असे सांगून ते काम करायला भाग पाडले. तहसिलदार शिल्पा ठोकडे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष संजय चितारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची जिवा सेनेची मागणी एका निवेदनवारे मुख्यमंत्री करण्यात आली आहे.

लॉक डाउन किंवा इतर कोणत्याही शासनाच्या नियमांचे पालन न करता प्रत्यक्ष कागलच्या तहसिलदार शिल्पा ठोकडे व इतर प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित हाेत्या. लॉक डाउनच्या काळात अशा चूकीच्या कामाला आपली मुक सम्मती देतात या मागचे गाैडबंगाल काय ? समजले नाही.
शिवाय आजपर्यंत राज्यातील ज्या ज्या सलुन दुकाना वरती कारवाई झाली ते सर्वजन एकच ग्राहक घेवून योग्य ती काळजी घेवून काम करीत होते. तरीही त्यांच्यावरती गुन्हे नोंद झाले, इथे तर त्या गरीब नाभिकाला पिंपळगावहून बोलावून घेवून त्याला केस कापायला लावले. साहेब, प्रतिष्ठीत लोकांनी किंवा तहसिलदारांसारख्या शासकीय कर्मचा-यानी काम करवून घेणे हे कितपत याेग्य आहे ? असा प्रश्न इथं निर्माण हाेताे.
शिवाय काँरटाईन केलेल्या लोकांचे केस कटींग, इतकेच जर ते गरजेचे वाटते तर मग आम्हाला रितसर काम करण्याची परवानगी द्या ना.किंवा या प्रकरणाची सखोल चौकशी करुन योग्य तो न्याय द्या. माझ्या या नाभिक बांधवापैकी जर कोणाला कोरानाची लागन झालीच तर त्याची सर्वस्वी जबाबदारी तिथे उपस्थित शासकीय अधिकार्यांची असेल संबधित प्रकरणा विषयी सखोल चौकशी करुन शासनाला कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY