प्रतिनिधी / सेनगाव – सध्या जगभरात कोरोना महामारी च्या संकटाने थैमान मांडले असून भारत पुर्णतः लॉकडाऊन करण्यात आलेले आहे याचाच फटका उद्योग क्षेत्रा ला सुद्धा बसला आहे तसेच अनेक अहवालानुसार अनेक लोकांचा रोजगार जाण्याची देखील शक्यता आहे.

शिक्षण क्षेत्र देखील बंद आहे याचे भान ठेवत सेनगाव येथील तोष्णीवाल महाविद्यालयाच्या वाणिज्य विभाग व उद्योजकता विकास कक्षाच्या डॉ. प्रवीण तोतला व डॉ. निखिलेश बजाज यांनी उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत एक प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार केला व गूगल फॉर्म च्या सहाय्याने त्याचे ऑनलाईन स्वरूपात अनेक व्हिडीओ ने साकारून तो सर्वांसाठी उपलब्ध करून दिला जेणेकरून बेरोजगार व येणारी भावी पिढी स्वतःचे उद्योग सुरू करू शकतील व आर्थिक संकटातून त्यांची मुक्तता होईल. सादर प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा ऑनलाईन स्वरूपाचा असून याचा आतापर्यंत 105 लोकांनी फायदा घेतला असून अजूनही तो चालू आहे तरी इच्छुकांनी या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा फायदा घ्यावा असे आवाहन तोष्णीवाल महाविद्यालयाद्वारे करण्यात आले आहे. सदर अभ्यासक्रमासाठी प्राचार्य तळणीकर, डॉ. अग्रवाल, डॉ. जोशी, डॉ. पजई, डॉ. भालेराव, प्रा. तडस व संपूर्ण महाविद्यालयाने विशेष प्रयत्न केले.

LEAVE A REPLY