कोरोनामुळे आज घरीच साजरा होणार परशूराम जन्मोत्सव

0
146

प्रतिनिधी / हिंगोली शहरात भगवान परशूराम जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते; परंतु यंदा कोरोना विषाणूच्या संकटामुळे लॉकडाऊन असल्याने देशहितास प्राधान्य देऊन भगवान परशूराम जयंती घरीच साजरी करण्याचा निर्णय परशूराम जयंती महोत्सव समितीतर्फे घेण्यात आला आहे.

प्रतीवर्षी मोठ्या उत्साहाने हिंगोलीत ब्रम्हश्री भगवान परशूराम यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. त्या निमित्त शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य दिव्य शोभायात्रा काढली जाते. तसेच रक्तदान व नेत्रदान शिबिरही घेतले जाते; परंतु यंदा संपूर्ण जगासह भारत व महाराष्ट्रात कोरोना या विषाणू आजाराचे संकट कोसळले आहे. त्यामुळे यावर्षी सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय सकल परशूराम ग्रुप हिंगोली व भगवान परशूराम जन्मोत्सव समितीतर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे परशूराम जन्मोत्सवाचा कार्यक्रम आप आपल्या घरी कोणत्याही शेजार्‍यांना न बोलाविता सोशल डिस्टंट ठेवून भगवान परशूराम यांची प्रतिमा पूजन करून आरती व घरगुती स्वयंपाकाचा नेवैद्य दाखवावा, जमल्यास सकाळी ११ ते ११.३० दरम्यान आरती ठेवावी, तसेच सर्वांनी सध्याच्या कोरोना या महामारीचे संकट दुर करण्या करीता भगवान परशूराम यांच्याकडे साकडे घालावे, घरातील तुळशीजवळ सायंकाळी ७ वाजता एक दीप व अगरबत्ती लावून सर्व जग सुखी राहो व कोरोना महामारी मुक्ती होवो ही प्रार्थना करावी असे आवाहन सकल परशूराम ग्रुप हिंगोली यांच्यावतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY